आज जवळपास संपुर्ण राज्य ज्याच्या सावलीच्या काळोखात हरवलय आणि ज्यामुळे अनेकांची आयुष्य च्छीनविच्छीन झाली आहेत
तो अवर्षणाचा अक्राळ विक्राळ निवडूंग राज्यात सर्वदूर पसरून निसर्गाच्या लहरीपणाला लागलेल्या विषारी फळाप्रमाणे भासत असला तरीहि प्रत्यक्षात प्रशासनापासून आपल्या सर्वांच्याच चुकांमध्ये त्याच बीज दडलय जे बर्याच आधी रोवल गेल आहे.
तो अवर्षणाचा अक्राळ विक्राळ निवडूंग राज्यात सर्वदूर पसरून निसर्गाच्या लहरीपणाला लागलेल्या विषारी फळाप्रमाणे भासत असला तरीहि प्रत्यक्षात प्रशासनापासून आपल्या सर्वांच्याच चुकांमध्ये त्याच बीज दडलय जे बर्याच आधी रोवल गेल आहे.
" एक ना धड भाराभार चिंध्या ह्या एकाच वाक्यातुन राज्यातील धरण आणि प्रामुख्याने सिंचन धरणांची वस्तुस्थिती सर्वांना समजु शकेल एव्हढि त्यांची महती ! आजच्या ईलेक्ट्रॉनिक , प्रिंट मिडीयामुळे आबालवृध्द सर्वांपर्यंत पोहोचुन सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरली . आजच्या भीषण वास्तवामागच ते एक प्रमुख कारण असल तरीहि ते केवळ एका मोठ्या आजाराच लक्षण आहे ज्या आजाराच नाव आहे " दुष्काळातील सुकाळ ! म्हणूंच बर्याच वर्षांपुर्वी ह्या विषयातील एक ज्येष्ठ तज्ञ पी. साईनाथ ह्यांचे ते वाक्य सर्वांच्या परिचयाचे झाले " दुष्काळ आवडे सर्वांना ! "
तर मित्रांनो ह्या दुष्काळाला घडवणार्या ह्याच कारणांपैकी काहि पुढिलप्रमाणे !
1 ) पाण्याच्या नियोजनाशिवाय वाढणरी शहर - महानगरांची संख्या आणि विस्तार !
2 ) शहरांसोबत गावतुनहि शासकीय यंत्रणांवर विसंबण्याचे दुष्परिणाम !
3 ) नद्या , तलाव , भुजल ई. सर्वच जलस्त्रोतांमधले प्रदुषण !
4 ) अनियंत्रित , असंतुलित विकासाने होणार्या निसर्गाच्या र्हासाचा नद्या , धरण , तलावांवरील दुष्परिणाम !
5 ) पारंपारिक शेतीचे बदलते स्वरूप !
6 ) वर्षानुवर्षांच्या अनुभवानंतरहि पॅकेज , घोषणा पुन्हा त्यातहि भ्रष्टाचार हे न सरणारे दुष्टचक्र !
- मकरंद सुधाकर पाटोळे कदम.



ऊत्तम लेख मकरंद सर!!!
उत्तर द्याहटवाखुप खुप धन्यवाद राजेश्वर सर.
हटवा