विकासगंगेच फसव चित्र थंडीतच कोरड्या पडलेल्या नळांनी ऊघड केल्यानंतर ह्यापुढे तरी आपले - परके , खर्या - खोट्यातला फरक ओळखुन दुर्लक्षित झालेल्या आड , नद्या , ओढ्यांची म्हणजेच आपल्या जीवनदायी जलस्त्रोतांची काकुळतीची हाक ऐकुन त्यांची दुरावस्था दूर करण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. त्यासाठी नद्या - ओढ्यांना नासवणारे प्रदुषण आणि नद्यांसकट धरण , बंधारे , तलावांचे अस्तित्वच बुजवायला निघालेला गाळ तसेच गाव - शहरातील भुजलाची दुरावस्था आणि खालावलेली पातळी ह्या आजच्या विदारक परिस्थितीविरोधात आपल्यातले सर्वप्रकारचे भेदाभेद विसरून समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांनी एकत्र येऊन ऋतुमानाप्रमाणे " नेमेची येऊन " दुष्काळात स्वार्थाचा सुकाळ आणणार्या ह्या अवर्षणाच्या दुश्चक्राला कायमस्वरूपी हद्दपार करण्याचे अथक शाश्वत प्रयत्न केले पाहिजेत आणि केवळ त्यानंतरच ह्या दुष्काळामागे दडलेल्या भस्मासुरांना जरब बसेल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा