वर्षानुवर्ष सुरू भ्रष्टाचाराचे दुष्टचक्र !
वैश्विक ऊश्मीकरण किंवा लहरी हवामानापेक्षाहि समाज , सरकार आणि प्रशासन ह्यांच्याकडून होणार्या अश्या अनेक अक्षम्य चुकांमुळे , भ्रष्टाचारामुळे अश्या दुष्काळांना त्यांची भीषणता मिळते. एकीकडे अनेक तज्ञ त्यातहि स्वत: राज्याच्या जलसंपदा खात्याचे माजी अधिकारी विजय पांढरे ह्यांच्या मते देशातील मोठमोठ्या आर्थिक सिंचन प्रकल्पांपेक्षा ' शिरपुर पॅटर्न ' म्हणून प्रसिध्द असलेल्या तंत्रज्ञानाची क्ष्मता बरीच अधिक असते. त्यात वर्षानुवर्ष मोठमोठ्या प्रकल्पांच्या घश्यात अब्जावधी ओतुनहि कोरडी राहिलेली भुमी हा स्वानुभव आणि दुसरीकडे त्याच पाण्यासंबंधीच्या जटिल प्रश्नांवर स्थानिकांनीच शोधलेली कमी खार्चिक पण सडेतोड ऊत्तर ! विविध ठिकाणच्या स्थानिक हवामानाचा पॅटर्न , जमिनीचा पोत , सदैव अवर्षणग्रस्त रहाणारे भुभाग तसेच शेतकर्यांची सामाजिक तसेच आर्थिक परिस्थिती हा सर्व डाटा किंवा मुद्देमाल जवळ असुनहि एरव्ही टेक्नॉलॉजीच्या वापरास आतुर असणारे आपल्यास समाजाचा , शेतकर्यांचा प्रतिनीधी म्हणवणारे आपले सर्वपक्षीय नेतेहि समाजाला ह्या संकटांतुन बाहेर काढण्यासाठी ( ट्रबल शुटिंगचे तेच भंगार पारंपारिक पुस्तक वाचण्यापलीकडे जाऊन ) विशेष काहिच करत नाहित. आणि त्यामुळेच कर्जमाफीपासून ते अवर्षणावरील तेच घासून घासून गंजलेले ऊपाय करून पुन्हा पुन्हा ऊद्धभवणार्या ह्या दुष्टचक्राचे खापर सर्वस्वी निसर्गावर फोडून स्वत: नामानिराळे होतात. [ प्रत्यक्षात ह्याच सर्वपक्षीय नेतेमंडळींमुळे निवडणूकीत मार खावा लागल्यावर त्या त्या पक्षांचे राज्यस्तरीय, राष्ट्रीय अध्यक्ष त्या नेत्यांची स्वत: जातीने "शाळा" घेतात आणि सर्व सुरळीत झाल आहे हि खात्री झाल्यावरच आपला मोर्चा दुसरीकडे वळवतात.
पण माझ्यामते आपल्याकडे निवडणूक जिंकणे हिच प्रथम आणि अंतिम गुणवत्ता मानण्याची सर्वपक्षीय परंपरा असल्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला ( पुढिल निवडणूकीपर्यंत ) काहि शिकवण्याचा अधिकार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनाहि नसावा म्हणूनच निवडणूकीचे तिकीट मिळवण्यासाठी नेत्याने समाजासाठी किती काम केलय ह्याऐवजी त्याच्या फेसबुक पेजला किती लाईक्स आहेत हा निकष असावा असे व्यवहार्य विचार प.पु.शहामुनींनीच काहि दिवसांपुर्वी जाहिररित्या व्यक्त केले हे ह्या राष्ट्रवादि देशाचे अहोभाग्य ! ]
पण ह्या वृत्तीमुळेच ह्यावर कायमस्वरूपी ऊपाययोजना होण्याऐवजी घोषणा , योजना , कर्जमाफी आणि पुन्हा त्यातहि भ्रष्टाचार असे हे दुष्टचक्र निसर्गचक्राप्रमाणे फिरतच राहून त्यामुळे सरकारी तिजोरी रिकामी होत जाऊनहि खर्या लाभाविना गरीब आणखी गरीब होत जाऊन सामाजिक विषमता वाढत जाते. त्यामुळे निदान ह्यापुढे तरी कुणाच्या खोट्या आशेवर बसण्यापेक्षा परिस्थिती बदलण्याचा आत्मविश्वास स्वत:त जागवल्यास " काखेत कळसा ........ ...... ! " ह्या म्हणीप्रमाणेच स्वत: प्रश्नातच दडलेली ऊत्तर आपल्यासमोर अलगद ऊलगडत जातील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा