जलस्त्रोतांमधले प्रदुषण !
अवघी पृथ्वी पाण्याने वेढलेली असुनहि विश्वातील गोड्या प्रमाण तुलनेत अतिशय कमी असल्याने ह्या ऊपलब्ध गोड्या पाण्याची कदर लोकसंख्येत दुसर्या क्रमांकावर असणार्या विकसनशील देशाला म्हणजेच आपल्या भारताला असणे अत्यावश्यक होते. पण नदि पाण्याची पुजा करून त्यांना प्रत्यक्ष देवस्वरूप मानणार्या आपल्या संपुर्ण भारतवर्षासहित महाराष्ट्रातल्याहि नद्या , तलाव , भुजल अश्या सर्वच प्रकारच्या जलस्त्रोतांमधील प्रदुषण आणि गलिच्छपणाने धोक्याची वेस केंव्हाच ओलांडली आहे. ( फक्त देवात दोष न पहाणार्या दृष्टीच्या नजरचुकीमुळे वास्तव आपल्या दृष्टीस पडले नाहि ईतकेच ! )
ह्या सर्वांसाठी प्रशासनासहित सर्वसामान्यांची म्हणजेच आपल्या सर्वांची वृत्ती जबाबदार आहेच पण जीवनाला विष बनवण्याच्या ह्या प्रक्रियेत सर्वात मोठा हात आहे कुणाचाहि वचक नसणार्या ऊद्योग - कारखाने , महानगरांचा आणि त्यातहि प्रामुख्याने राज्यातील जवळपास सर्वच महानगरपालिकांचा ! कारण रासायनिक , जैविक , औद्योगिक तसेच ईतर घनकचरा व सांडपाणी ई. महत्वाच्या प्रश्नांना वर्षानुवर्ष दुर्लक्षित करून राज्यातील ह्या गब्बर महानगरपालिका कित्येक दशकांपासून राज्यातल्या सर्वच प्रकारच्या जल्स्त्रोतांना " स्वकर्तृत्वाने " कुजवत गेल्या. कारण घातक पाण्यावर प्रक्रिया करून ते नदि , नाले ई. मध्ये सोडण्याचा नियम असतानाहि संबंधितांकडे ( महापालिका - प्रशासनाकडे ) दुषित पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठीची यंत्रणाच नसल्याने किंवा असल्यास ती पुरेशी सक्षम नसल्याने महानगरांचे हे प्रदुषण ह्या पारंपारिक जलस्त्रोतांच्या नसानसात भिनुन त्यामुळे ते जीवनदायी जलस्त्रोतच मृत्युमुखी पडले आणि अश्याप्रकारे ऊदोऊदो करण्यात धन्यता मानणार्या स्वकेंद्रि मानवीवृत्तीने जणू नद्या , ओढे तलावांच्या अनुक्रमे नाले , गटार आणि डबक्यांच्या रूपात समाध्याच बांधुन ह्या जीवनदायी जलस्त्रोतांना बनवले यमदुत रोगराईंचे आगर !
पण मित्रांनो एखाद्या हिमनगाप्रमाणे नद्या , तलावातील प्रदुषण हा ह्या प्रदुषणरूपी राक्षसाचा फक्त एक चेहरा होता जमिनीखाली तर त्याने आपले हात-पाय फार दूर दूरवर पसरून विश्वातील गोड्या पाण्याच्या सर्वात मोठ्या साठ्याला म्हणजेच भुजलालाहि प्रदुषणाने नासवून त्याद्वारे खर्या अर्थाने हे प्रदुषण मानवतेच्या मुळावर ऊठले .
जमिनीखालील ह्या जीवनाच्या अंताची सुरूवात मात्र जमिनीवरील जलस्त्रोतांच्या प्रदुषणातुनच झाली. आणि महत्वाचे म्हणजे ईथेहि औद्योगिक प्रदुषणानेच प्रथम क्रमांक पटकावला कारण कुठल्याहि प्रक्रियेविना नदि - तलावात सांडपाणी सोडणार्या ऊद्योगांच्या विरोधात आवाज ऊठु लागताच ह्यातील बर्याचश्या हुश्शार ऊद्योगांनी आपले जलप्रदुषणाचे पाप दडवण्यासाठी भुमिला जवळ करण्याचे तंत्र अवलंबुन त्यायोगे आपले करोडो लिटर दुषित पाणी मशिन्सच्या सहाय्याने चक्क आपल्याच हद्दीतील जमिनीत मुरवण्याचे ऊद्योग सुरू केले. पण अर्थातच कुठलीच सीमा किंवा हद्द नसलेले हे अतिप्रदुषित पाणी जमिनीत मुरल्यावर काहि काळातच त्यातील विष भुमीत दूरदूरवर पसरत जाऊन जमिनीखालील झरे , प्रवाहांमार्फत ते विष नद्या , तलावांपासून , विहिरी , बोअरवेल्सपर्यंत पोहोचुन ह्या ऊद्योगांचे काळे गुपित ऊघडे तर पडते पण भुजलामृताला नासवल्यावर आणि अने निष्पाप्यांचा बळी घेतल्यावर !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा