ह्यातील जलस्त्रोतांच्या प्रदुषणाबाबत खर तर तोच ऊतारा आहे जो सर्वांना मृत्युचा विळखा वाटतोय म्हणजे जलपर्णी !
नद्या - तलावांसारख्या जलस्त्रोतांना गिळून टाकणार्या ह्या जलपर्णीस पहाताच हॉलीवूडच्या चित्रपटातील परग्रहावरून आलेल्या विनाशकारी प्राण्याची आठवण होते. नक्कीच दाटिवाटिने जलस्त्रोतात अस्ताव्यस्त पसरणार्या जलपर्णीमुळे ते पाणी हलूहि शकत नाहि आणि त्यात सुर्यप्रकाशहि पोहोचु शकत नाहि पण प्रत्यक्षात हे पाणी आणि त्यातले जीवन प्रदुषणामुळे आधीच l नासलेले असते आणि हि जलपर्णी केवळ त्या पाण्यातील प्रदुषणाची निदर्शक ( प्रदुषणाची माहिती देणारी ) असते. ती त्या पाण्यात असते कारण प्रदुषित पाण्यातील अनेक घातक विषारी घटकच तिचे खाद्य असल्याने ते पाणी तिच्यासाठी नंदनवन असते. पण हिच तिची काळी नाहि तर ऊजळ बाजु असते. कारण तिच्या ह्याच स्वभावामुळे सहजच ती पाण्यातील अनेक विषारी घटकांना शोषुन घेते व आपोआपच कुठल्याहि खर्चाविना ती पाण्याला बर्याचप्रमाणात शुध्दहि करते.
अमेरिकेतील सुप्रसिध्द अंतराळ संशोधन संस्था "नासा"च्या मदतीने 70 च्या दशकातच जलपर्णीतील जलशुध्दीकरणाच्या सकारात्मक शक्तीचा ऊपयोग करून घेण्यास सुरूवात झाली तेंव्हापासून आजतागायत अमेरिकेसारख्या अतिप्रगत देशांपासून बांग्लादेशसारख्या अविकसित देशांनीहि ह्या वनस्पतीच्या शक्तीचा आपापल्यापरीने ऊपयोग करून घेतला.
भारतातहि 90 च्या दशकात सांगलीतील औद्योगिक वसाहतीत जलपर्णीपासून जलशुध्दीकरणाचा छोटेखानी प्रकल्प सुरू होऊन पुढे त्याला यश मिळूनहि नंतर मात्र काहि कारणास्तव हे सर्व दुर्लक्षित होऊन काळाच्या पडद्याआड गेले.
प्रत्यक्षात जलप्रदुषणासारख्या समस्येशी झुंजणार्या भारतासारख्या विकसनशील देशासाठीच देवाने ह्या जलपर्णीस घडवले असावे कारण आपल्या देशाचे ऊष्ण - दमट हवामान ह्या जलपर्णीच्या वाढिसाठी अत्यंत पोषक आहे. त्याचवेळी ऊद्योगांसोबत महानगर - गावातुन निर्माण होणारे प्रदुषित पाणी आणि वर्षानुवर्ष त्यावर प्रक्रिया करण्यासाठीच्या अपुर्या यंत्रणेचे रडगाणे आणि एकुणच ह्या ऊल्हासामुळे देशाच्या वाट्याला आलेला कधीहि न सरणारा प्रदुषणाचा जीवघेणा फाल्गुनमास अश्या सर्व प्रकारच्या परिस्थितीवर जलपर्णी कुठल्याहि संजीवनीपेक्षा कमी नाहि. त्यामुळेच आजच्या घडीला देशभरात अश्या प्रकल्पांचे महत्व अनन्यसाधारण अश्या
प्रकल्पांसाठी थोड्या जास्त जागेची गरज भासते पण देशभरात जिकडे , तिकडे मोठ्या प्रमाणात ओसाड , वैराण जमिनींची भरमार असल्याने जागेचा प्रश्न हा जलपर्णी प्रकल्पासाठी अडथळा ठरू शकत नाहि. तसेच जवळपास ( म्हणजेच शहर , कारखाने ई. दुषित पाण्यांच्या स्त्रोतांच्या जवळ ) शुध्दीकरण प्रकल्पासाठीची जागा ऊपलब्ध नसल्यास हे प्रदुषित पाणी पंपाच्या सहाय्याने दूरवर नेऊनहि हि प्रक्रिया करता येऊ शकते.
जलपर्णीच्या वाढिचा वेग जास्त असल्याने अश्या प्रकल्पातुन दररोज थोडी थोडी जलपर्णी काढत राहिल्यास साधारणत: महिन्याभरात त्या प्रकल्पातली जलपर्णी पुर्णपणे बदलली जाऊन प्रकल्पात नव्याने ऊगवलेली जलपर्णीच शिल्लक राहून त्या नव्या दमाच्या जलपर्णीमुळे जलशुध्दीकरणाची कार्यक्षमतहि वाढते ( किंवा कायम रहाते.)
पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या प्रकल्पातुन दररोज टाकाऊ कचरा म्हणून निघणारी जलपर्णी तर प्रकल्प आणि समाजासाठी सोन्याच अंड देणारी कोंबडी असते.
कारण ह्या जलपर्णीपासून खत , जनावरांसाठी खाद्य ई. अनेक ऊपयुक्त गोष्टी निर्माण होतातच पण त्याहिपेक्षा लक्षवेधी गोष्ट हि की ह्या टाकाऊ पदार्थांवर वाढलेल्या जलपर्णीपासून चक्क मिथेनसारख्या ईंधनाची निर्मितीहि करता येऊ शकते.
ह्या जलशुध्दीकरणाच्या प्रक्रियेत जलपर्णीकडून एकुण दुषित
पाण्यापैकी "फक्त" 13% पाणी वापरले जाऊन त्या मोबदल्यात जलशुध्दीकरणाचा ऊद्देश 100% सफल होतो.
म्हणजेच मित्रांनो "आंधळा मागतो एक
अन देव देतो दोन डोळे ! " हा वाक्प्रचारहि अगदिच थिटा वाटावा अशी ह्या जलपर्णीची अगाध महती !
थोडक्यात हि जलपर्णी आपल्यासाठी साक्षात कल्पवृक्ष ( ईच्छीलेले देणारी ) आहे. आणि तिच्याद्वारे प्रदुषणाच्या अरण्यात हरवून गेलेल्या पाण्याला परत मिळवण्याऐवजी आपण पुराणांमधल्या धर्म - जातींची " घरवापसी " करण्यासाठी ऊत्सुक आणि समर्पित असु तर आपला देश भविष्यात जाण्याऐवजी आदिमानवयुगात परत जाईल ह्याबद्दल माझ्या मनात काहि शंका नाहि.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा