असंतुलित विकासाचे जलस्त्रोतांवरील
गेल्या दिड - दोन दशकांपासून वेग घेतलेल्या विकास प्रक्रियेसाठी डोंगर , तसेच आसपासच्या निसर्गावर कुर्हाड चालवण्याचे प्रमाण वाढत जाऊन घनदाट नयनरम्य वनराई - हिरवळीने झाकलेले डोंगर , टेकड्या ऊघड्या - बोडक्या झाल्याने त्यांच्यासोबत जमिनीला एकसंध बांधुन ठेवणारा घटकच ( म्हणजेच वनस्पती आणि त्यांची मुळ ! ) दुर्मिळ होत गेल्याने डोंगरऊतारावरून वाहून येणारी माती गाळाच्या रूपात नद्या , धरण , तलाव , बंधार्यात भरत जाऊन एकप्रकारे त्यांच्या मुळावरच ऊठली.
त्याचवेळी दुसरीकडे धरणांद्वारे पाण्यावर ताबा मिळवून मानवाने केलेले पुर नियंत्रण हे आपल्याला वरदान वाटत असले तरीहि प्रत्यक्षात अश्याप्रकारे नैसर्गिक पुरास रोखुन एकप्रकारे आपण तिचा श्वास कोंडत आहोत आणि आपल्या ह्या अट्टाहासापोटि हजारो वर्षांचा ईतिहास असलेल्या त्या नदिस आपण ईतिहासांच्याच पानात पुरत आहोत हे आपल्यातील किती जणांना ठाऊक असते. सहसा कुणालाच नाहि. आणि सर्वसामान्यांचे हे अज्ञानच नद्यांच्या घातास कारणीभुत ठरते
ह्या वस्तुस्थितीचे एक प्रातिनिधीक ऊदाहरण म्हणजे पुणे जिल्यातील मुळा नदि ! ह्या नदितहि वाहून येणार्या गाळाच प्रमाण बरच जास्त आहे. हिचा प्रवाह मुख्यत: मुळशी धरणापासून सुरू होतो पण ह्या मुळशी धरणातील पाणी विजनिर्मीतीसाठी वापरले जात असल्याने हे धरणातील पाणी नदिपात्राऐवजी विजनिर्मितीकरता दुसर्या दिशेत वळवले गेल्याने ह्या मुळा नदिस सहसा पुर येत नाहि.
मुळा नदिबाबत धरण बांधण्याआधी नियमित येणार्या नैसर्गिक पुरांमुळे सृष्टी संतुलन राखुन होती. पण हेच मानवाने आपल्या ऊपयोगासाठी धरण बांधुन ह्याच नदिचे पाणी नदिपात्राऐवजी दुसर्या दिशेत वळवल्याने नदिस पुर येण्याची नैसर्गिक प्रक्रिया बंद होऊन नदिपात्रात वाहून येणार्या गाळास ( माती , दगड , जैविक पदार्थ ई. ) वाहून नेणारी शक्तीहि नष्ट झाल्याने दिवसेंदिवस तो गाळ नदिपात्रात साठत जाऊन त्याचे एकुण आकारमान वाढत गेले. त्याचवेळेस बारमाहि नसल्याने पावसाळ्याव्यतिरिक्त नदिच्या प्रवाहाचा प्रतिरोध नसल्याने एरव्हीच्या काळात त्या गाळातील दमट आणि अत्यंत पोषक मातीमध्ये नदिपात्रात दूरून दुरून वाहून आलेली बीज अंकुरित झाली आणि मग नदिपात्रातील त्या पोरक्या विस्थापित बिजांनी आपल्याप्रमाणेच विस्थापित असलेल्या नदिपात्रातील गाळावर झुडूपांच्या रूपातला आपला संसार थाटताच पहाता पहाता त्या झुडूपांच्या मुळांनी नदिपात्रातील त्या बेवारशी गाळाला एकसंध करून त्या विस्थापित गाळाला प्रस्थापित बेटांचे स्वरूप दिले
( परप्रांतातुन येऊन अनधिकृत वस्तीत रहाणारे विस्थापित आपल्याच प्रांतातुन आलेल्या एका टिनपाट नेत्यास ईथल्या राजकारणात प्रस्थापित करून ज्याप्रमाणे ईथल्या जमिनीत आपली मुळ घट्ट रोवतात अगदि त्याचप्रमाणे | आता कुणी कुणाचा गुण ऊचलला राम जाने ! )
आत्ता नदिपात्रात पसरलेल्या ह्या बेटांमुळे पाण्याचा प्रतिरोध अधिक वाढत जाऊन नदिपात्र ऊथळ बनुन ह्या नदिमुळे येणार्या पुरांचे क्षेत्रफळ , त्यांची घातकता आणि पुराचे प्रमाण वाढत गेलेच पण त्याचवेळेस त्याच गाळामुळे नदितील पाणी जमिनीत झिरपू न शकल्याने नदिशेजारील जमिनीतल्या जलस्त्रोतांची म्हणजेच भुजलाची स्थितीहि द्यनिय होऊन त्याचा गावातल्या पारंपारिक आड / विहिरी आणि बोअरवेल्समधुन मिळणार्या पाण्याची ऊपलब्धताहि फार वेगाने कमी होत गेली.
अश्याप्रकारे फक्त पुरापासून रक्षण आणि विजनिर्मितीसाठी बनवल्या गेलेल्या धरणांमुळे माणसाने प्रत्यक्षात एकाऐवजी अनेक प्रश्न बनवले.
पण मित्रांनो वाईटातुन चांगले घडते ते हे असे दुष्काळामुळे मुळा व त्याप्रमाणेच राज्यभरातील अश्याप्रकारच्या " धरणग्रस्त " गावांना घाबरवणारा तो गाळ आणि धरणांचे काळे वास्तव जगासमोर तरी येऊ शकले अन्यथा " दृष्टी आड सृष्टी " ह्या वचनाप्रमाणे मानवनिर्मित काळा दुष्काळ सर्वांसाठी परकाच राहून आपल्याला दुष्काळाच्या मुळापर्यंत पोहोचताच आले नसते

posted from Bloggeroid
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा